पहिनेजवळील बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 2, 2017 00:23 IST2017-07-02T00:21:18+5:302017-07-02T00:23:24+5:30

पहिनेजवळील बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

One dies drowning in a nearby bundle, and one dies | पहिनेजवळील बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

पहिनेजवळील बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पहिनेजवळील डोहात दोन अभियांत्रिकीचे विद्यार्थी बुडून मरण पावल्याची घटना ताजी असताना येथून जवळच असलेल्या माही फार्मच्या बंधाऱ्यात बुडून एका चाळीस वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१) सकाळच्या सुमारास उघडकीस आली़ रवींद्र महादेव गोसावी (४०, रा़ त्र्यंबकेश्वर, मूळ रा़ पिंप्री ता़ सिन्नर, जि़ नाशिक) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि़१) सकाळी आठ वाजेच्या सुमारास पहिने परिसरातील माही फार्मच्या बंधाऱ्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली़ त्यानुसार पोलिसांनी मयत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला, मात्र ओळख पटली नाही़ यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे कर्मचारी भाबड हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बंधाऱ्यातून मृतदेह काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला़ सायंकाळी मयत व्यक्तीची ओळख पटली व ते रवींद्र गोसावी असल्याचे समोर आले़

Web Title: One dies drowning in a nearby bundle, and one dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.