विजेच्या आवाजामुळे आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
By Admin | Updated: November 17, 2014 00:20 IST2014-11-17T00:20:23+5:302014-11-17T00:20:47+5:30
विजेच्या आवाजामुळे आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

विजेच्या आवाजामुळे आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
नाशिक : मुसळधार पावसात कोसळलेल्या विजेच्या आवाजामुळे टाकळी येथील गजानन रोकडे या इसमाला तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ रविवारी सायंकाळच्या सुमारास शहरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला़ पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच काठे गल्लीत चहाचे दुकान असलेले गजानन मांगू रोकडे (४०, रा. टाकळी) हे तपोवनात चक्कर मारण्यासाठी गेले होते़ अचानक सुरू झालेला पाऊस व विजांच्या कडकडाटात एक ठिकाणी वीज पडल्याचा मोठ्ठा आवाज झाला़ या आवाजामुळे घाबरलेल्या रोकडे यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला़ तपोवनात असलेल्या नागरिकांनी याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाला कळविल्यानंतर महापालिकेच्या वाहनाने रोकडेंना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ़भोये यांनी रोकडे यांना तपासून मयत घोषित केले़ त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार असून, यापूर्वीही त्यांना एकदा हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती नातेवाइकांनी दिली़ (प्रतिनिधी)