झाडावरून पडून एकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 17, 2017 18:14 IST2017-05-17T18:14:45+5:302017-05-17T18:14:45+5:30

बेलतगव्हाण परिसरात झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

One death due to fall from the tree and the death of one | झाडावरून पडून एकाचा मृत्यू

झाडावरून पडून एकाचा मृत्यू

नाशिक : बेलतगव्हाण परिसरात झाडावरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेलतगव्हाण येथील शेतकरी संतोष कोंडाजी माळी मंगळवारी (दि. १६) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर आंबे उतरवत असताना ही घटना घडली. झाडाच्या शेंड्याला असलेले आंबे उतरविण्याच्या प्रयत्नात त्यांचा अचानक तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले; मात्र ते उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Web Title: One death due to fall from the tree and the death of one