सर्व तालुक्यांतील एका दिवसातील नवीन रुग्णसंख्या एका आकड्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:17 IST2021-08-15T04:17:40+5:302021-08-15T04:17:40+5:30

नाशिक : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ तालुक्यांमध्ये आता दररोजच्या नवीन रुग्णसंख्येचे प्रमाण एका आकड्यात आले आहे. त्यातही पेठ आणि ...

One day new number of patients in all talukas in one figure! | सर्व तालुक्यांतील एका दिवसातील नवीन रुग्णसंख्या एका आकड्यात !

सर्व तालुक्यांतील एका दिवसातील नवीन रुग्णसंख्या एका आकड्यात !

नाशिक : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ तालुक्यांमध्ये आता दररोजच्या नवीन रुग्णसंख्येचे प्रमाण एका आकड्यात आले आहे. त्यातही पेठ आणि सुरगाणा हे दोन तालुके तर पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार ८५८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ९४ हजार १८६ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत १ हजार १२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक ३४, बागलाण २५, चांदवड ३६, देवळा १९, दिंडोरी २७, इगतपुरी ०८, कळवण ०५, मालेगाव ३२, नांदगाव २३, निफाड ९२, पेठ ००, सिन्नर १४०, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०२, येवला ४० असे एकूण ४८३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५८७ मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ४० तर जिल्ह्याबाहेरील १८ रुग्ण असून असे एकूण १ हजार १२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ८५८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.०० टक्के, नाशिक शहरात ९८.०१ टक्के, मालेगावमध्ये ९६.८४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ इतके आहे. तर नाशिक ग्रामीण ४ हजार १०४ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९५८ मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हाबाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इन्फो

तालुक्यातील शुक्रवारचे बाधित

जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी नाशिक तालुक्यात १, बागलाणला १, चांदवडला ४, दिंडोरीला १, इगतपुरीला १, मालेगावला २, नांदगावला २, निफाडला ७, सिन्नरला ८ तर येवल्याला ५ याप्रमाणे दिवसभरातील नवीन बाधितांची संख्या एका आकड्यातच आली आहे. उर्वरित पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, देवळा, कळवण या पाच तालुक्यांमध्ये तर दिवसभरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

Web Title: One day new number of patients in all talukas in one figure!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.