नाशिकमधून जुन्या चलनातील एक कोटीची रक्कम जप्त

By Admin | Updated: April 10, 2017 14:54 IST2017-04-10T14:34:03+5:302017-04-10T14:54:45+5:30

शहरात पुन्हा एकदा जुन्या चलनामधील एक हजार व पाचशेच्या नोटांची एक कोटीची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.

One crore of old currency seized from Nashik | नाशिकमधून जुन्या चलनातील एक कोटीची रक्कम जप्त

नाशिकमधून जुन्या चलनातील एक कोटीची रक्कम जप्त


नाशिक : शहरात पुन्हा एकदा जुन्या चलनामधील एक हजार व पाचशेच्या नोटांची एक कोटीची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी द्वारका भागात सापळा रचून मुंबईनाका पोलिसांनी संशयास्पद मोटार ताब्यात घेतली. मोटारीची झडती घेतली असता त्यामधून चलनातून बाद झालेल्या एक हजार व पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सागर कुलथे यासह सुमारे चार संशायितांना अटक केली आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्यात नोटांची जेव्हा मोजदाद करण्यात आली तेव्हा सुमारे एक कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर रक्कम शहरातील एका माजी नगरसेवकापर्यंत पोहच केली जाणार होती, असे समजते.

 

Web Title: One crore of old currency seized from Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.