ठक्कर बाजारजवळ एकास बेदम मारहाण

By Admin | Updated: April 23, 2016 00:52 IST2016-04-22T23:35:51+5:302016-04-23T00:52:18+5:30

ठक्कर बाजारजवळ एकास बेदम मारहाण

One breathless assault near Thakkar Bazar | ठक्कर बाजारजवळ एकास बेदम मारहाण

ठक्कर बाजारजवळ एकास बेदम मारहाण

नाशिक : वाहनास कट मारल्याची कुरापत काढून दोघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़ १९) दुपारच्या सुमारास ठक्कर बाजारजवळ घडली़
याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूरच्या महाराष्ट्र कॉलनीतील रहिवासी रोहित उत्तम शिरोळे (२४) हे दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात असता कट मारल्याची कुरापत काढून संशयित संकेत राजेंद्र सोनवणे
(रा. मखमलाबाद रोड) व अमोल गणेश जाधव (रा. पंचवटी) यांनी हुज्जत घालून बेदम मारहाण केली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: One breathless assault near Thakkar Bazar