पंचवटीमध्ये गावठी कट्यासह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 16:44 IST2017-08-03T16:42:31+5:302017-08-03T16:44:30+5:30

पंचवटीमध्ये गावठी कट्यासह एकास अटक
पंचवटी : पेठरोड परिसरात सराईत गुंड गावठी कट्ट्यासह संशयास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांच्या गस्त पथकाला मिळाली. पोलिसांनी तत्काळ येथील नवरंग हॉलजवळ उभा असलेला अमोल अनिल सोनवणे (२३) याची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उपनगर परिसरात राहणारा अमोल सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत जबरी चोरी, लूटमारसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अमोल हा संशयास्पदरीत्या परिसरात वावरत होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महेश इंगोले, पोलीस हवालदार आप्पा गवळी, मोतीराम चव्हाण, सतीश वसावे, जितू जाधव, बस्ते, सचिन म्हस्दे आदींनी तत्काळ पेठरोडवरील नवरंग हॉलजवळ सापळा रचून अमोल यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली. दरम्यान, त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.