अवैध मद्यसाठा प्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:31+5:302020-12-05T04:21:31+5:30

------- मालेगावी दुचाकी चोरी मालेगाव : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील पोलीस चौकीजवळ उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची ...

One arrested in illegal liquor case | अवैध मद्यसाठा प्रकरणी एकास अटक

अवैध मद्यसाठा प्रकरणी एकास अटक

-------

मालेगावी दुचाकी चोरी

मालेगाव : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारील पोलीस चौकीजवळ उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची हीरोहोंडा ग्लॅमर दुचाकी क्र. एमएच १५ बीए ०९७० ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही चोरी झाली. बाळनाथ देवराज शिंदे (३८) रा. हिंगणवाडी, ता. नांदगाव यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक गायकर करीत आहेत.

-------

एटीएम मशीनचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा

मालेगाव : शहरातील सटाणा रोडवर गंगामाय मंगल कार्यालयासमोर पंजाब नॅशनल बॅंकेच्या इमारतीनजीक बुधवारी रात्री १० ते गुरुवारी सकाळी ९ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी पंजाब नॅशनल बॅंकेचे एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम कापून पाच लाख ५० हजार रुपये किमतीचे नुकसान केले म्हणून कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वसंत हरिभाऊ जोशी, रा. मित्रनगर, सोयगाव यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार डिंगर करीत आहेत.

-------

पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा

मालेगाव : शहरातील गुरुवार वॉर्ड बेलबाग येथे ३० नोव्हेंबर रोजी मुलगी हरविल्याच्या कारणावरून पत्नीस बेदम मारहाण केल्याप्रकरणी पती मोबीन अहमद व इतर तीन जणांविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जाकीरा मोबीन अहमद (२३) हिने आझादनगर पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादीची मुलगी अनाबिया हरविल्याच्या कारणावरून आरोपी पती मोबीन अहमद, नणंद, सासू व दीर यांनी मारहाण केली व घरातून हाकलून देण्याचा दम दिला. अधिक तपास पोलीस नाईक आव्हाड करीत आहेत.

------

वडगाव येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मालेगाव : तालुक्यातील वडगाव येथे राहत्या घरी केतन दादाजी शेवाळे (२७) याने घराच्या छतास साडी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. पाेलीस पाटील खुशालचंद शिंदे यांनी वडनेर खाकुर्डी पोलिसात खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

--

Web Title: One arrested in illegal liquor case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.