दीड हजार विद्यार्थ्यांची पीएच.डी. प्रवेशपरीक्षा
By Admin | Updated: June 22, 2015 00:03 IST2015-06-22T00:02:35+5:302015-06-22T00:03:07+5:30
मुक्त विद्यापीठ : राज्यभरातून १४६३ विद्यार्थी

दीड हजार विद्यार्थ्यांची पीएच.डी. प्रवेशपरीक्षा
नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पीएच.डी.साठी राज्यभरातील १४६३ विद्यार्थ्यांनी आज प्रवेशपरीक्षा दिली. विविध विद्याशाखांच्या ४६ जागांसाठी सदर परीक्षा घेण्यात आली.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने नियमित आणि पूर्णवेळ पीएच.डी. सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीची आॅनलाइन प्रवेश परीक्षा रविवारी राज्यात विविध केंद्रांवर घेण्यात आली. पीएच.डी.साठी एमकेसीएलच्या सहकार्याने राज्यातील एकूण ७२ केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी सुमारे दीड हजार विद्यार्थी हजर होते. या परीक्षेसाठी राज्यभरातून १५४१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १४६३ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश परीक्षा दिली. प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या पीएच.डी.मुळे मुक्त विद्यापीठाच्या संशोधनाला चालना मिळणार आहे. उत्तीर्ण उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि तोंडी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.
पात्र ठरलेल्या उमेदवारांना आपले संशोधन कार्य विद्यापीठात संबंधित विद्याशाखेत पूर्णवेळ थांबून करावे लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रु पये दरमहा विद्यावेतन (फेलोशिप) दिले जाणार आहे. अंतिम निवड यादी प्रसिद्ध होऊन निवड यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्याचीदेखील व्यवस्था विद्यापीठाने केलेली आहे. (प्रतिनिधी)़