शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

दररोज दीड हजार किलो ‘कोविड बायो वेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 01:23 IST

नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने ‘कोविड बायो वेस्ट’चे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. दररोज दीड हजार किलो इतका कचरा कोविडच्या सरकारी व खासगी रुग्णालयांमधून संकलित करत त्याची योग्य त्यापद्धतीने खबरदारी घेत विल्हेवाट लावली जात आहे. एकूणच कोरोनाच्या संक्रमणामुळे आता रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि सर्वच बाबींवर ताण वाढताना दिसत आहे.

ठळक मुद्देधावताहेत पाच वाहने : नॉनकोविड वैद्यकीय कचऱ्यातही लक्षणीय वाढ

नाशिक : शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्याने ‘कोविड बायो वेस्ट’चे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. दररोज दीड हजार किलो इतका कचरा कोविडच्या सरकारी व खासगी रुग्णालयांमधून संकलित करत त्याची योग्य त्यापद्धतीने खबरदारी घेत विल्हेवाट लावली जात आहे. एकूणच कोरोनाच्या संक्रमणामुळे आता रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि सर्वच बाबींवर ताण वाढताना दिसत आहे.मागील काही दिवसांपासून कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने सरकारी व खासगी कोविड रुग्णालये धरून एकूण ५० ते ५५ रुग्णालयांमधून कोविड वैद्यकीय कचरा अर्थात डॉक्टर, परिचारिकांनी वापरलेले पीपीई सूट, हातमोजे, हेड कॅप, मास्क आदींचे संकलन एका खासगी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांमार्फत केले जात आहे. यासोबतच दररोज निघणाºया नॉनकोविड बायो वेस्टचे प्रमाणदेखील वाढले असून, दिवसाला तो कचरा तीन हजार किलोपर्यंत जाऊन पोहोचला आहे. शहराबाहेर एका मोकळ्या जागेत असलेल्या प्रकल्प केंद्रावर या कचºयाची विल्हेवाट लावली जात आहे. त्यासाठी येथे कार्यरत असलेली कामगारांची फळी अहोरात्र झटत ‘कोरोना योद्धा’ची भूमिका बजावताना दिसून येते.८०० ते १००० तापमानाखाली कचरा नष्टकोविडचा कचरा ज्या बॅगमध्ये भरलेला असतो ती बॅगदेखील विशिष्टप्रकारची असते. त्यामधून कुठल्याहीप्रकारे कचरा सांडणार नाही, याची खबरदारी घेतलेली असते. प्रकल्पावर इन्फिनिरेशन प्रक्रि येद्वारे कचरा प्रथम ८५० ते ९०० डिग्री तापमानात जाळला जातो. त्यानंतर या कचºयाची राखदेखील १००० डिग्री इतक्या तापमानात जाळली जाते. राख पाण्याने थंड करून ईटीपीद्वारे त्यावर पुनर्प्रक्रि या करून पाण्याचा पुनर्वापर केला जातो. या सर्व प्रक्रि येसाठी व शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी सुमारे १२५ कर्मचारी अहोरात्र झटत आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाpollutionप्रदूषण