जिल्हा रुग्णालयात महिनाभरात दीड कोटींची औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:53 IST2017-10-02T23:52:53+5:302017-10-02T23:53:00+5:30
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगाने होत असताना जिल्हा रुग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा आहे़ या समस्येवर उपाय काढण्यासाठी जिल्हा आरोग्य समितीची सोमवारी (दि़२) तातडीची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत येत्या महिनाभरात एक कोटी ६० लाख रुपयांची औषधे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली़ या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयातील औषध तुटवडा कमी होणार आहे़

जिल्हा रुग्णालयात महिनाभरात दीड कोटींची औषधे
नाशिक : जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच संसर्गजन्य रोगांचा प्रसार वेगाने होत असताना जिल्हा रुग्णालयात मात्र औषधांचा तुटवडा आहे़ या समस्येवर उपाय काढण्यासाठी जिल्हा आरोग्य समितीची सोमवारी (दि़२) तातडीची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत येत्या महिनाभरात एक कोटी ६० लाख रुपयांची औषधे खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली़ या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयातील औषध तुटवडा कमी होणार आहे़
जिल्हा आरोग्य समितीचे सदस्य आमदार डॉ़ राहुल अहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा आरोग्य समितीची बैठक झाली़ या बैठकीमध्ये वातावरणातील बदलांमुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लू, डेंग्यू तसेच संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना औषधांचा मात्र तुटवडा वाढत चालल्याने औषधांची नितांत आवश्यकता असल्याचे आमदारांना सांगण्यात आले़