दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाखाची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:18 IST2021-08-13T04:18:17+5:302021-08-13T04:18:17+5:30
या रोकड चोरीप्रकरणी नवीन आडगाव नाक्यावरील सम्राट वृंदावन सोसायटी येथे राहणाऱ्या जमनभाई वल्लभभाई गेडिया यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा ...

दुचाकीच्या डिक्कीतून दीड लाखाची रोकड लंपास
या रोकड चोरीप्रकरणी नवीन आडगाव नाक्यावरील सम्राट वृंदावन सोसायटी येथे राहणाऱ्या जमनभाई वल्लभभाई गेडिया यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी गेडिया यांनी पंचवटी कारंजा येथे असलेल्या एका दुकानासमोर दुचाकी (क्र. जीजे १५ एसी १३३९) उभी करून फळे खरेदीसाठी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीची डिक्की उघडून त्यात ठेवलेल्या हँडपर्समधून ५०० रुपयांच्या ३०० नोटा अशी एक लाख ५० हजार रुपयांची रक्कम लांबविली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
---इन्फो---
पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर
पंचवटी कारंजा येथे दुचाकीच्या डिक्कीतून लाखो रुपये चोरी झाल्याची घटना घडली आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तेथून
पंचवटी कारंजा पोलीस चौकी अवघ्या शंभर फुटावर आहे, तरीदेखील चोरट्यांनी रक्कम लांबविल्याने पोलिसांचा पंचवटी भागात वचक संपुष्टात आला की काय, अशी चर्चा होऊ लागली आहे.