दीड लाखाचा गांजा जप्त, दोघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:25 IST2021-05-05T04:25:15+5:302021-05-05T04:25:15+5:30
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने सोमवारी (दि.३) मध्यरात्री ही कारवाई केली. मुद्देमाल ...

दीड लाखाचा गांजा जप्त, दोघांना पोलीस कोठडी
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने सोमवारी (दि.३) मध्यरात्री ही कारवाई केली. मुद्देमाल व ट्रक पोलिसांनी जप्त केला असून दोघा संशयितांना रमजानपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवरे मळा भागात विक्रीच्या उद्देशाने एका ट्रकमधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती विशेष पथकातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलीस निरीक्षक रामेश्वर घुगे, महाले, भोये व राठोड यांनी छापा टाकला. ट्रक (क्रमांक एम. एच. ४१, जी ७१६५) मध्ये १ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ३१ किलो गांजा आढळून आला. हा ट्रक गुजरातला जाणार होता. पोलिसानी संशयित आरोपी शेख अस्लम शेख उस्मान (रा. मालेगाव) व अक्रम खान अब्बास खान (राहणार गुजरात) या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.