शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

हार्डवेअरच्या दुकानात आढळली दीड फूट लांबीची घोरपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:28 IST

बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली

ठळक मुद्देवन्यजीव अनेकदा शहरी भागात येण्याच्या घटना आठवडाभरापूर्वी चार वानर शहराच्या पंचवटी भागात

नाशिक : शहराच्या मध्यवर्ती भागात रेडक्रॉस चौकातील एका हार्डवेअरच्या दुकानात अडगळीच्या जागेत सुमारे दीड फूट लांबीची घोरपड हे वन्यजीव आढळून आले. बुधवारी (दि.२५) वनविभागाचे कर्मचारी व वन्यजीवप्रेमींनी घोरपडला सुरक्षित ‘रेस्क्यू’ केले.शहराच्या मध्यवर्ती भागात वन्यजीव येण्याचे प्रमाण अलिकडे वाढू लागले आहे. शहराजवळची वृक्षराजींचा आधिवास दिवसेंदिवस कमी होत चालला असून नैसर्गिक ठिकाणांवरही नागरिकांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. परिणामी वन्यजीव अनेकदा वाट चुकून शहरी भागात येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. आठवडाभरापूर्वी चार वानर शहराच्या पंचवटी भागातील फुलेनगर परिसरात भटकंती करताना आढळून आले होते. महिनाभरापुर्वी शरणपूररोड येथील एका व्यावसायिक संकुलाच्या तळ मजल्यातून घोरपडीचे लहान पिल्लू वन कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर बुधवारी पुन्हा पुर्ण वाढ झालेली घोरपड चक्क एका हार्डवेअरच्या दुकानातून ‘रेस्क्यू’ करण्यात आली. दुकानदाराने वनविभागाशी संपर्क साधून घोरपड असल्याची माहिती कळविली. त्यानंतर तत्काळ पश्चिम नाशिकचे वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, राजेंद्र ठाकरे, इको-एको वन्यजीवप्रेमी संघटनेचे वैभव कुलकर्णी, सुखदा गायधनी आदिंनी हार्डवेअरच्या दुकानात पोहचून घोरपड सुरक्षितपणे ताब्यात घेतली. घोरपड संपुर्णत: तंदरूस्त असल्यामुळे तीला तत्काळ सायंकाळी नैसर्गिक अधिवासात वन कर्मचाऱ्यांकडून मुक्त करण्यात आले.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवNashikनाशिकforest departmentवनविभाग