शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! नाशिकमध्ये आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण; 10 वर्षांच्या मुलाला लागण झाल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 13:57 IST

नाशिक - अवतीभोवतीच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच दाखल झालेला ओमायक्रॉन गुरुवारी (दि. ३०) नाशकातही दाखल झाला आहे. गंगापूर रोड परिसरातील एक ...

नाशिक - अवतीभोवतीच्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच दाखल झालेला ओमायक्रॉन गुरुवारी (दि. ३०) नाशकातही दाखल झाला आहे. गंगापूर रोड परिसरातील एक दहा वर्षांचा मुलगा ओमायक्रॉनने बाधित आढळल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या बालकात कोणतीही लक्षणे आढळून आली नसून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

मुंबईसह पुणे, ठाणे, औरंगाबाद, नगर या नाशिकलगतच्या जिल्ह्यांमध्ये ओमायक्राॅनचे रुग्ण यापूर्वीच आढळले होते. मात्र, नाशिककर आतापर्यंत त्यापासून लांब होते. बुधवारी सायंकाळी संबंधित बालकाचा अहवाल ओमायक्रॉन बाधित असल्याचे आढळल्याने मनपा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासकीय स्तरासह आरोग्य यंत्रणांकडूनही विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील काही संशयित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील हा नमुना बाधित आढळून आला आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता हा विषाणू पसरू नये, यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज आहे. स्वतःचे लसीकरण करून घेणे हे यावरील सर्वाधिक महत्त्वाचे सुरक्षाकवच असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

आई-वडील बाधित मात्र प्रकृती स्थिर

१८ डिसेंबरला सर्वप्रथम या बालकाचे आई-वडील कोरोनाबाधित झाल्याचे आढळले. त्यानंतर १९ तारखेला या बालकाचीही चाचणी केल्यानंतर तो बाधित आढळून आला. दरम्यान, संबंधित खासगी लॅबने त्या बालकाचे नमुने रॅन्डम तपासणी म्हणून जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले. त्याचा अहवाल प्राप्त होण्यास १२ दिवसांचा कालावधी लागला असून, हा बालक ओमायक्रॉनग्रस्त असल्याचे त्या तपासणीत आढळले आहे. दरम्यान, आता या बालकाच्या माता-पित्याचे तसेच त्याच्याशी संबंधित रुग्णांचे नमुनेदेखील जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले.

यंत्रणा अलर्टवर

गेल्या दहा दिवसात हे तिन्ही रुग्ण घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत होते. मात्र, बालकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याला एका खासगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. बालक हा असिम्प्टॅमॅटिक असून, प्रकृतीदेखील स्थिर असल्याचा आरोग्य विभागाला दिलासा आहे. मात्र, पहिलाच कोरोना रुग्ण आढळला असल्याने जिल्ह्यातील आणि मनपा क्षेत्रातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, अधिकाधिक दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या