जलतरण स्पर्धेत नाशिकला पदकांची लयलूट

By Admin | Updated: October 6, 2014 00:10 IST2014-10-05T22:55:35+5:302014-10-06T00:10:04+5:30

जलतरण स्पर्धेत नाशिकला २३ सुवर्ण ९२ पदकांची लयलूट

Olympic medal for swimming in Nashik | जलतरण स्पर्धेत नाशिकला पदकांची लयलूट

जलतरण स्पर्धेत नाशिकला पदकांची लयलूट

 नाशिक : राज्य असोसिएशन जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित १७ व्या मास्टर्स जलतरण स्पर्धेत नाशिकच्या संघाने २३ सुवर्ण, ३८ रौप्य व ३१ कांस्य अशा ९२ पदकांची लयलूट केली़ अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या़ राज्यभरातील ५३० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता़ यामध्ये नाशिकच्या ५३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता़ पदकविजेत्यांमध्ये हरी सोनकांबळे यांनी सर्वाधिक तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी सहा पदके मिळवली़ पुरुषोत्तम सेजवळ यांनी चार सुवर्णपदके पटकावली़ अजय मिश्रा यांनी दोन सुवर्ण व प्रत्येकी एक रौप्य व कांस्य, निरजा साठे यांनी दोन सुवर्ण व प्रत्येकी एक रौप्य व कांस्य, जुई पेठे यांनी एक सुवर्ण व पाच रौप्यपदके पटकावली़ राजेंद्र निंबाळते यांनी तीन रौप्य व दोन कांस्यपदके मिळवली़ राधिका गोडबोले यांनी दोन सुवर्ण व दोन रौप्यपदके मिळवली़ श्रबस्ती चक्रवर्ती यांनी दोन सुवर्ण व एक रौप्यपदक पटकावले. यांसह जयंत केले यांनी दोन सुवर्ण, सलील केळकर यांनी एक सुवर्ण व एक रौप्य, मुक्ता कुलकर्णी यांनी दोन रौप्य व तीन कांस्य, सुरेश खैरनार यांनी एक सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक मिळवले़ फ ारूख शेख यांनी एक सुवर्ण, राजेंद्र उधवंत यांनी एक सुवर्ण व एक रौप्य, संगीता बेणी यांनी एक सुवर्ण व तीन कांस्य अशी चार पदके पटकावली़ या स्पर्धकांना अजय मिश्रा, सुमित गोखले, राजेंद्र निंबाळते, हरी सोनकांबळे यांचे मार्गदर्शन लाभले़

Web Title: Olympic medal for swimming in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.