निफाड तालुक्यातील वृद्धेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:41 IST2018-10-03T01:40:48+5:302018-10-03T01:41:06+5:30

नाशिक : निफाड तालुक्यातील वृद्धेचा मंगळवारी (दि़ २) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ सुनीता सोनवणे (रा. मांजरगाव) असे वृद्धेचे नाव आहे.

Oldfate swine flu death in Niphad taluka | निफाड तालुक्यातील वृद्धेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

निफाड तालुक्यातील वृद्धेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

ठळक मुद्देदोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे़

नाशिक : निफाड तालुक्यातील वृद्धेचा मंगळवारी (दि़ २) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला़ सुनीता सोनवणे (रा. मांजरगाव) असे वृद्धेचे नाव आहे.
सुनीता सोनवणे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते़ प्रकृती अधिक बिघडल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला़ सद्यस्थितीत स्वाइन फ्लू कक्षात एकूण २६ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी दोघांचे स्वाइन फ्लूचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़ यामध्ये एक स्त्री व पुरुषाचा समावेश आहे़ रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षातील २४ रुग्णांचे तपासणी अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे़

Web Title: Oldfate swine flu death in Niphad taluka