विवाहाचे आमिष दाखवून वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By Admin | Updated: May 21, 2014 23:42 IST2014-05-21T23:37:56+5:302014-05-21T23:42:55+5:30
नाशिक : कामटवाडा परिसरात राहणार्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून एक वृद्ध नऊ महिन्यांपासून बलात्कार करीत असल्याची फि र्याद पीडित मुलीने अंबड पोलीस ठाण्यात दिली आहे़ अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कामटवाडा परिसरात राहणार्या अल्पवयीन मुलीला संशयित रमेश सुकदेव अहिरे (६२, रा़ ३०, रेशमसुख बंगला, धन्वंतरी मेडिकलच्या मागे, कामटवाडे, नाशिक) या वृद्धाने लग्नाचे आमिष दाखवले़ तसेच या मुलीवर जबरदस्ती करून जुलै २०१३ ते मार्च २०१४ या नऊ महिन्यांच्या कालावधीत रेशमसुख बंगला तसेच नाशिक व त्र्यंबक येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला़ दरम्यान, या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फि र्यादीनुसार अंबड पोलिसांनी रमेश अहिरे या वृद्धावर बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़(प्रतिनिधी)