जुन्या वाहनांच्या बाजारालाही मंदीच्या झळा

By नामदेव भोर | Published: January 12, 2020 03:47 PM2020-01-12T15:47:22+5:302020-01-12T15:55:46+5:30

वाहनविक्रीचा व्यवसाय मंदीच्या मार्गावर रडतखडत धावत असतानाच नाशकातील जुन्या वाहनांच्या  बाजारातही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जुनी वाहने आणि गाड्यांच्या सुट्या भागांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक शहरातील मुंबईनाका, सारडा सर्कल परिसरही  सध्या मंदीचे चटके सोसत आहे.  गेल्या दोन दशकांपासून या भागात वाढलेल्या जुन्या वाहानांच्या सुट्टे भागांच्या बाजारात आता शुकशुकाट दिसून येत आहे.

The old vehicle market also suffered a downturn | जुन्या वाहनांच्या बाजारालाही मंदीच्या झळा

जुन्या वाहनांच्या बाजारालाही मंदीच्या झळा

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात वाढतोय जुन्या वाहनांचा खच सेकण्ड हॅण्ड वाहन बाजाराला मंदीच्या झळा ग्राहकांमधली क्रयशक्ती अभावी मागणी घटली

नाशिक : एकीकडे वाहनविक्रीचा व्यवसाय मंदीच्या मार्गावर रडतखडत धावत असतानाच नाशकातील जुन्या वाहनांच्या  बाजारातही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जुनी वाहने आणि गाड्यांच्या सुट्या भागांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक शहरातील मुंबईनाका, सारडा सर्कल परिसरही  सध्या मंदीचे चटके सोसत आहे.  गेल्या दोन दशकांपासून या भागात वाढलेल्या जुन्या वाहानांच्या सुट्टे भागांच्या बाजारात आता शुकशुकाट दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासून असलेल्या मंदीच्या प्रभावामुळे  कष्टकरी व कामगार वर्गाच्या क्रयशक्तीत अपेक्षेप्रमाणे वाढ  होऊ न शकल्याने त्याचा परिणाम शहराती जुन्या वाहनांच्या बाजारपेठेवरही होताना दिसून येत असून शहरातील विविध भागातील वापरलेल्या वाहनांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडे जुन्या वाहनांचे खच पडल्याचे चित्र दिसून येत आहे. 
नाशिकमध्ये मुंबई नाका, सारडा सर्कल परिसरात विविध प्रकारच्या जून्या वाहनांचे सर्व सुटे भाग ग्राहकांना मिळतात. या ठिकाणी अनेक वाहनांचे भाग सुटे करण्यासोबतच त्यांची वर्गवारी करून ते व्यापारी वा गॅरेजचालकांना विकले जायचे. अशा सुट्या भागांना बाजारात भरपूर मागणी असते. ते
स्वस्तात उपलब्ध होतात. सुट्या भागांच्या खरेदीसाठी वाहनमालक बऱ्याचदा स्वत: येऊन  या बाजारातून सुटे भाग खरेदी करीत. परंतु सध्या या बाजारालाही मंदीच्या झळा बसू लागल्या आहेत. एकीकडे मध्यम वर्गातील ग्राहकांच्या क्रयशक्तीत वाढ होत नसल्याने वाहनांच्या मागणीत झालेली घट आणि आर्थिक दुर्बल वर्गातून मध्यम वर्गात प्रवेश करण्यास उत्सूक वर्गाची असलेल्या घटकाची क्रयशक्तीच निर्माण होत नसल्याने जुन्या वाहन बाजारावरही मंदीचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या बाजारातही शुकशुक ाट असल्याने अनेक व्यावसायिकांनी नफा कमाविण्याच्या उद्देशाने खरेदी केलेली वाहने, त्यासोबतच विक्रीतून कमीशन मिळविण्यासाठी विक्रीसाठी ठेवलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा शहरातील वेहवेगळ््या भागात खच पडल्याचे दिसून येत आहे. किमान व मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांचे आपले स्तःचे घर आणि चारचाकी वाहन असावे असे स्वप्न असते.परंतु उत्पन्न मर्यादा आणि वाहनांच्या वाढणाऱ्या किंमतील यामुळे अनेकां नवीन वाहन खरेदी करणे शक्य होत नाही. अशा ग्राहकांकडून काही दिवस वापरलेल्या जून्या वाहनांना पसंती मिळते. त्यामुळे गेल्या दीड ते दोन दशकांमध्ये वापरलेल्या वाहनांचा बाजार तेजीत होता. परंतु, गेल्या तीन ते चार वर्षात मंदीच्या झळा बसल्याने अनेक उद्योग बंद झाले. तर अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे वापरलेल्या वाहनांच्या बाजारावरही त्याचा परिणाम झाला असून वापरलेल्या वाहनाच्या खरेदी विक्रीचे व्यावहारही ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रणाण शासनाच्या परिवहन  विभागाच्या दिवसेंदिवस बदलणाऱ्या नियमांचाही वापरलेल्या वाहनांच्या बाजारावर प्रभाव पडत असल्याचे काही व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Web Title: The old vehicle market also suffered a downturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.