जुन्या नाशकात घंटागाडी अनियमित
By Admin | Updated: May 21, 2014 23:59 IST2014-05-21T23:37:54+5:302014-05-21T23:59:54+5:30
नाशिक : गेल्या महिनाभरापासून जुने नाशिक परिसरात घंटागाडी अनियमित येत असल्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. जुन्या नाशकात अरुंद गल्लीबोळ तसेच चढ-उतार अधिक असल्यामुळे चालकांकडून घंटागाडी केवळ मुख्य रस्त्यानेच फिरविली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. चौकमंडई, बागवानपुरा पोलीस चौकी, नाईकवाडीपुरा शौचालयाजवळ, कोकणीपुरा, चौक मंडई रस्ता, सारडा सर्कल-आझाद रस्ता, खडकाळी, घासबाजार आदि ठिकाणी कचर्याचे ढिग साचत असल्याचे चित्र आहे.