वृद्ध महिलेचे मंगळसूत्र खेचले

By Admin | Updated: August 8, 2016 23:59 IST2016-08-08T23:48:18+5:302016-08-08T23:59:31+5:30

वृद्ध महिलेचे मंगळसूत्र खेचले

Old man's mangalasutra pulls | वृद्ध महिलेचे मंगळसूत्र खेचले

वृद्ध महिलेचे मंगळसूत्र खेचले

नाशिक : शहरात दुचाकीस्वारांकडून महिलांचे सौभाग्यलेणे लुटण्याचे सत्र सुरू झाले असून, काठे गल्लीतील एका महिलेचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि़८) सकाळच्या सुमारास घडली़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी रोडवरील जय शंकर गार्डनपरिसरात राहणाऱ्या प्रमिला सुभाष छाजेड (६५) या सकाळी दहा वाजेच्या सुमारास काठे गल्लीतील त्रिकोणी गार्डनपासून पायी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा हेल्मेटधारी संशयितांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले़ याप्रकरणी छाजेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Old man's mangalasutra pulls