दोनशे रुपये दिले नाही म्हणून वृद्धास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST2021-07-18T04:11:49+5:302021-07-18T04:11:49+5:30

याप्रकरणी ज्ञानेश्वर यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती बाबूराव आव्हाड, दिगंबर नारायण आव्हाड दोघेही रा. दापूर यांच्याविरुद्ध शुक्रवार (दि. १६) रोजी गुन्हा ...

The old man was beaten for not paying two hundred rupees | दोनशे रुपये दिले नाही म्हणून वृद्धास मारहाण

दोनशे रुपये दिले नाही म्हणून वृद्धास मारहाण

याप्रकरणी ज्ञानेश्वर यांच्या फिर्यादीवरून निवृत्ती बाबूराव आव्हाड, दिगंबर नारायण आव्हाड दोघेही रा. दापूर यांच्याविरुद्ध शुक्रवार (दि. १६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ज्ञानेश्वर आव्हाड हे पित्ताचा त्रास होत असल्याने सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गोळी घेऊन झोपलेले असताना आरोपी यांनी झोपेतून उठवून २०० रुपये आहे का विचारले असता ज्ञानेश्वर यांनी माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. तसेच मी आजारी आहे मला त्रास देऊ नका, असे सांगितल्याचा रा. आल्याने त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली, तसेच हाताच्या बुक्कीने तोंडावर मारत तोंडातील दात पाडून गंभीर दुखापत केली व आमच्या नादी लागला तर मारून टाकू, असा दम दिला. फिर्यादी यांनी रुग्णालयात उपचार घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र उशिरा मिळाल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The old man was beaten for not paying two hundred rupees