खर्डेत वृद्धाने जाळून घेत जीवनयात्रा संपविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST2021-06-04T04:11:50+5:302021-06-04T04:11:50+5:30

देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डे ता. देवळा येथील प्रगतिशील शेतकरी बाबुराव शंकर गांगुर्डे (८०) हे पत्नीसमवेत राहत होते. बुधवारी ...

The old man ended his life by burning in Kharda | खर्डेत वृद्धाने जाळून घेत जीवनयात्रा संपविली

खर्डेत वृद्धाने जाळून घेत जीवनयात्रा संपविली

देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डे ता. देवळा येथील प्रगतिशील शेतकरी बाबुराव शंकर गांगुर्डे (८०) हे पत्नीसमवेत राहत होते. बुधवारी (दि. २) रात्रीच्या सुमारास त्यांनी स्वतःला जाळून घेतले. सदर घटना गुरुवारी (दि.३) सकाळी गल्लीत राहणाऱ्या नागरिकांना समजली. त्यानंतर त्यांच्या घराजवळ गर्दी जमा झाल्याने त्यांच्या पत्नी राधाबाई या पती फिरायला गेल्याचे सांगत होते. मात्र पतीने जाळून घेतल्याची कल्पना त्यांना नसल्याने या घटनेची खबर पोलीस पाटील भरत जगताप यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ देवळा पोलीस ठाण्यात माहिती दिली. बीट हवालदार एस. ए. पवार, नितीन साळवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याच्या स्थितीत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जागेवर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृत गांगुर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. ए. पवार, नितीन सावळे करीत आहेत.

Web Title: The old man ended his life by burning in Kharda