नाशिकमधील जुन्या पिढीतील गायक काकासाहेब घारापूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 13:55 IST2020-02-23T13:54:43+5:302020-02-23T13:55:24+5:30

प्रसिद्ध गुरू आणि विद्वान पं स. भ. देशपांडे यांच्याकडे त्यांचे अभिजात संगीताचे शिक्षण झाले होते. 

old generational singer from Nashik Kakasaheb Gharapurkar passed away | नाशिकमधील जुन्या पिढीतील गायक काकासाहेब घारापूरकर यांचे निधन

नाशिकमधील जुन्या पिढीतील गायक काकासाहेब घारापूरकर यांचे निधन

नाशिक- येथील  जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरू पं. काकासाहेब घारापूरकर यांचे आज सकाळी वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. अंत्यविधी सायं 6 वा. अमरधाम येथे होणार आहे. 

प्रसिद्ध गुरू आणि विद्वान पं स. भ. देशपांडे यांच्याकडे त्यांचे अभिजात संगीताचे शिक्षण झाले होते. नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर येथे त्याकाळात अनेक मोठ्या कलावंतांचे कार्यक्रम आयोजित केले. शिवाय अनेक नामवंत कलावंतांना संवादिनीची साथसंगत केली. त्यात पं. बसवराज राजगुरू ,पं. वसंतराव देशपांडे , पं. पद्माकर कुलकर्णी , पं. राजा काळे अशा अनेक प्रसिद्ध कलावंतांचा समावेश होता. त्या काळात त्यांनी नाशिक म्युझिक सर्कलची स्थापना केली. जिल्हा सांस्कृतिक संघटनेचे ते महत्वाचे सदस्य होते. या संस्थेतर्फे नाशिकमध्ये दरवर्षी शास्त्रीय संगीताचा मोठा महोत्सव होत असे. त्याचप्रमाणे नाशिक च्या मेन रोड वरील गणपती मंदिरातील शास्त्रीय संगीताची परंपरा त्यांनी अनेकवर्ष चालवली आणि संगीत सेवा केली.


संगीतकार म्हणूनही त्यांनी काम केलेले असून त्यांनी संगीत दिलेली योगगीते प्रसिद्ध आहेत, नाशिकमध्ये पूर्वी कलाअरर्घ्य संस्थेने सादर केलेल्या आणि खूप गाजलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाच्या संगीत संयोजनाची जबाबदारी ही सांभाळली होती. 
गुरू म्हणूनही त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये सुनील देशपांडे, मृदुला देव यांचा समावेश आहे.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: old generational singer from Nashik Kakasaheb Gharapurkar passed away