्रपंचवटीत वीज पडून वृद्ध ठार
By Admin | Updated: May 28, 2014 01:11 IST2014-05-28T01:08:06+5:302014-05-28T01:11:20+5:30
नाशिक : तपोवनातील रामटेकडी परिसरात राहणार्या एका वृद्धाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र हरी मोरे (६०, रा़ तपोवन, रामटेकडी, फि ल्टर हाऊसजवळ) हे दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर एका झाडाखाली आश्रयाला थांबले होते़ यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडल्याने ते गंभीररीत्या भाजले़ त्यांना उपचारासाठी त्यांचा मुलगा मधुकर रामचंद्र मोरे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ राजपूत यांनी मयत घोषित केले़ (प्रतिनिधी)