शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

शनिचौकात जुन्या वाड्याची भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:58 IST

नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शनिचौक परिसरातील सोन्या मारुती मंदिराजवळील पवार वाड्याची भिंत रविवारी (दि २८) दुपारी कोसळली. या घटनेत रिक्षाचालकासह त्याची बहीण असे दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पंचवटी : नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे शनिचौक परिसरातील सोन्या मारुती मंदिराजवळील पवार वाड्याची भिंत रविवारी (दि २८) दुपारी कोसळली. या घटनेत रिक्षाचालकासह त्याची बहीण असे दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. यानंतर महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत वाड्यातील सर्व रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.शनिचौक परिसरात पन्नास-साठ वर्षांपूर्वीचा पवार वाडा असून, याठिकाणी पाच ते सहा भाडेकरू राहतात. दोन तीन दिवसांपासून संपूर्ण शहरात पावसाची संततधार सुरू असून, रविवारी दुपारच्या सुमाराला पवार वाड्याची भिंत कोसळली. यावेळी वाड्याबाहेर उभ्या असलेल्या रिक्षा (एमएच १५ झेड ९६६८) मध्ये चालक कृषांत कपिल काची (२९) व त्याची बहीण कामिनी लक्ष्मण धागजे असे दोघे बसले असताना अचानक वाड्याची भिंत कोसळली. रिक्षावर वीट, मातीचा ढिगारा पडल्याने काची व त्याची बहीण कामिनी असे दोघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वाड्यात बबन शिरसाठ, अंजीना काची, शारदा चौधरी, नागेश आव्हाड, तुषार पंडित आदी भाडेकरू राहात असून, या सर्वांना सुरक्षेची खबरदारी म्हणून वाड्याबाहेर काढण्यात आले आहे. वाड्याची भिंत कोसळल्याची माहिती परिसरात राहणाऱ्या एका नागरिकाने अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पंचवटी अग्निशमन दलाचे सहायक अधिकारी जे. एस अहिरे, एस. जी. कानडे, नितीन म्हस्के, डी. पी. पाटील, एम. एच. गायकवाड, एस. डी. भालेराव, एम. एस. पिपळे आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाड्यात अडकलेल्या सर्वच रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले.वाड्यातून सुटका करण्यात आलेल्या सर्वांची महापालिकेतर्फे गणेशवाडीत राहण्याची सोय करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेत रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काची यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर त्याची बहीण कामिनी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसHomeघर