बनावट एटीएमकार्डद्वारे वृद्धास गंडविले
By Admin | Updated: December 29, 2015 23:16 IST2015-12-29T23:15:30+5:302015-12-29T23:16:48+5:30
बनावट एटीएमकार्डद्वारे वृद्धास गंडविले

बनावट एटीएमकार्डद्वारे वृद्धास गंडविले
नाशिक : पंचवटी परिसरातील दिंडोरी रस्त्यावरील मेरी परिसरात राहणाऱ्या एका ७३ वर्षीय वृद्धाचे बनावट एटीएम कार्ड तयार करून अज्ञात संशयिताने ठाणेच्या अॅक्सिस बॅँकेच्या एटीएममधून सुमारे ३७ हजार ४०० रुपये काढून गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
जयंतीलाल शंकर ललवाणी (७३, रा. सुरशक्ती सोसायटी, गोरक्षनगर) यांचे सेंट्रल बॅँक आॅफ इंडियाच्या म्हसरूळ शाखेत बचत खाते आहे. या बचत खात्याचे बनावट एटीएम कार्ड चोरट्याने तयार करून ठाणेच्या दुसऱ्या बॅँकेच्या एटीएममध्ये जाऊन रक्कम काढली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ललवाणी यांच्या फिर्यादिवरून चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)