शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मुंबईपासून ‘ओखी’ ६७० कि.मीवर : नाशिकच्या किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर; ‘ओखी’ वादळाचा परिणाम

By azhar.sheikh | Updated: December 4, 2017 16:22 IST

पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतोढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटरओखी वादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे निरिक्षण पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान

नाशिक : मागील दोन दिवसांपासून नाशिकच्या किमान तपमानाचा पारा अचानकपणे वेगाने वाढत असल्याने शहरातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नाशिककरांना येऊ लागला आहे; मात्र ढगाळ हवामान झाल्यामुळे दिनकराचे दर्शनही याबरोबर दुर्लभ झाले आहे. १०.२ अंशापर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा थेट १६.१ अंशावर पोहचला आहे. मागील दोन दिवसांमध्ये सहा अंशाने ही वाढ झाल्याचे निरिक्षण हवामान खात्याच्या निरिक्षण केंद्राने नोंदविले. ओखी वादळ मुंबईपासून अवघ्या ६७० किलोमीटर अंतरावर असून वादळ पुढे गुजरातच्या दिशेने सरकत असल्याचे पुणे वेधशाळेचे म्हणणे आहे. यामुळे पश्चिम भागात पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रत ढगाळ हवामान काही दिवस राहणार असून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ शकतोढगाळ हवामानामुळे किमान तपमानात वाढ होत असून दक्षिण भारताला तडाखा दिलेल्या ‘ओखी’ वादळाचा हा परिणाम असण्याची शक्यता हवामान निरिक्षण केंद्राकडून वर्तविली जात आहे. कारण दोन दिवसांपुर्वी शहराचे हवामान उत्तम होते. थंडीची तीव्रताही जाणवत होती आणि सुर्यप्रकाशही पडत होता; मात्र अचानकपणे रविवारपासून वातावरणात कमालीचा बदल होऊन ढग दाटण्यास सुरुवात झाली. सोमवारी (दि.४) पहाटेपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. १६.१ इतके जास्त किमान तपमान नोंदविले गेले.

गेल्या वर्षी मात्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याची थंडी होती. काही दिवसांपुर्वी सातत्याने घसरत असलेला किमान तपमानाचा पारा लक्षात घेता डिसेंबरचा पहिला आठवडा हा क डाक्याच्या थंडीचा असू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता; मात्र अचाकपणे लहरी निसर्गाने आपले रुप बदलले असून दोन दिवसांपासून कमालीचे ढग दाटत असल्याने हवामानात आर्द्रता वाढू लागल्याने किमान तपमानात वाढ होत आहे.

भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकलेल्या ‘ओखी’ वादळाचे थैमानाने ३५ बळी घेतले आहेत. ताशी १३० कि. मी वेगाने हे वादळ लक्षद्वीपवर आदळले. तामिळनाडू, केरळ या राज्यांना ‘ओखी’ ने जबर तडाखा दिला असून पुढे हे वादळ गुजरातच्या दिशेने सरकण्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळGujaratगुजरातMumbaiमुंबईRainपाऊसNashikनाशिक