ओखी प्रभाव : पावसामुळे नाशिक - गुजरात महामार्गाची झाली गटारगंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 12:52 IST2017-12-06T12:51:50+5:302017-12-06T12:52:03+5:30
पेठ - कालपासून झालेल्या संततधार पावसाने गुजरात महामार्गाची अक्षरश: गटारगंगा झाली असून प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूकीला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

ओखी प्रभाव : पावसामुळे नाशिक - गुजरात महामार्गाची झाली गटारगंगा
पेठ - कालपासून झालेल्या संततधार पावसाने गुजरात महामार्गाची अक्षरश: गटारगंगा झाली असून प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाल्याने अवजड वाहनांसह प्रवासी वाहतूकीला समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
नाशिक ते पेठपर्यंत गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे दुपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून पूर्वीचा रस्ता खोदून काढल्याने पावसामूळे रस्त्यावर गाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यात अवजड वाहनाच्या वर्दळीने रस्त्याची पुरती चाळण झाली असून अनेक वाहणे गाळात अडकून पडली आहेत. तर प्रवासी वाहतूकदारांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ठेकेदारांनी केवळ मलमपट्टी म्हणून टाकलेले मातीचे भराव खचून गेल्याने वाहने चिखलात रूतून बसली आहेत.
रस्त्यावर साचलेल्या गाळातून मार्गक्र मण करतांना वाहनाच्या चाकातून फेकला जाणारा चिखल समोरून येणार्या वाहनावर फेकला जात असल्याने वाहनचालकामध्ये चिखलफेक करून खटके ऊडसांना दिसून येत आहे. तर चिखलामुळे दुचाकीस्वारांना मात्र प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
एकीकडे वाहनधारकांसह प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत असतांना संबंधित कामावरील ठेकेदार मात्र याकडे सोयीस्कर रित्या डोळे झाक करत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता सर्रासपणे रस्ता उखडण्याचे काम सुरू असल्याने नाशिक ते पेठ 50 किमी अंतर कापण्यासाठी दोन ते अडीच तास लागत आहेत.