शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ओझरचा खंडेराव महाराज यात्राेत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:04 IST

ओझर : शेकडो वर्षांची परंपरा असलेला ओझरचा खंडेराव महाराज यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला. यात्रा कमिटी, महसूल, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत व स्थानिक नागरिक यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत पोलीस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले यांनी ही माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार राज्यातील इतर सर्वच यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चंपाषष्ठीला होणारी खंडेराव महाराज यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यात्रा सुरु राहिल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवताना अडचण येईल, त्यामुळे बारा गाड्यांची मिरवणूक करता येणार नाही. परंतु स्थानिक ठिकाणी बारा गाडे ठेवून मानकरी कुटुंबातील सदस्यांकडून पूजा अर्चा करुन घ्यावी असेही डॉ. भोसले यांनी सांगितले. चंपाषष्ठीनिमित्त भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येता येईल. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन पाच ते सहा फुटांचे अंतर ठेवून दर्शन घ्यावे. चंपाषष्ठीच्या दिवशी बारा गाडे ,मोंढा गाडा (देवाचा गाडा) मिरवणूक तसेच कुठलाही सार्वजनिक उत्सव करता येणार नाही. भाविकांनी विनाकारण गर्दी करुन नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल केले जातील, याची नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.यावेळी तहसीलदार शरद घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा कदम, ग्रामसेवक डी. बी. देवकर, प्रशासक कैलास गादड ,डॉ. अक्षय तारगे, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, धनंजय पगार , युवराज शेळके, कार्याध्यक्ष राम कदम ,खजिनदार अशोक शेलार, विठ्ठल कर्पे, कांचन जाधव ,परशराम शेलार ,बापू चौधरी ,हरिभाऊ पगार ,प्रशांत पगार ,प्रशांत चौरे,रामदास शेजवळ,विठ्ठल मंडलिक,सुरेश कदम आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक