ओझरला अपघातात महिला ठार
By Admin | Updated: January 13, 2017 00:55 IST2017-01-13T00:49:06+5:302017-01-13T00:55:18+5:30
ओझरला अपघातात महिला ठार

ओझरला अपघातात महिला ठार
ओझरटाउनशिप : मुंबई-आग्रा महामार्गावर महामार्ग सुरक्षा पोलीस चौकीजवळ मालट्रक व कार यांच्या झालेल्या तिहेरी अपघातात महिला ठार व दोन जण जखमी झाले.
कार (एमएच ४३ एजे १६३२) पिंपळगावकडून ओझरकडे येत असताना पुढे जात असलेल्या आयशर मालट्रकला ( एमपी ०९ सीसी ६३६५) ओव्हरटेक करीत असताना आयशरचा पुढील भाग कारच्या मागील डाव्या बाजूला लागल्याने कारचे टायर फुटले, त्यामुळे कार पुढे जात असलेल्या दुसऱ्या मालट्रकच्या (एमएच १५ बीजे ८८०८) मागील बाजूला जाऊन धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील एका महिलेसह तीन जण गंभीर जखमी झाले असता महामार्ग सुरक्षा पोलिसांनी त्यांना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी सुशीलाबाई अभिमन निकम (वय ६५, रा. टाकळी मालेगाव) यांचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)