कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी, गरीब विद्यार्थ्यांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने घरी असलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला होता. त्यात तांदूळ, तूर दाळ, मटकी, मूग यांपैकी कोणतीही एक डाळ दिली गेली. सध्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी, मध्यान्ह भोजन व्यवस्था सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, घरपोच पोषण आहार दिला जात आहे.
------
असे आहे पोषण आहाराचे प्रमाण
शासनाकडून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. त्यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर ग्रॅम तांदूळ प्रती दिवस तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १५० ग्रॅम तांदूळ दिला जातो. कडधान्याबाबत शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाते.
---------
जिल्ह्यातील पोषण आहार लाभार्थी
७,६०,०००
शहरातील लाभार्थी
१,१०,०००
ग्रामीण भागातील लाभार्थी
६,५०,०००
----------------
कोरोनामुळे मध्यान्ह पोषण आहार शाळा बंद असल्याने बंद करण्यात येऊन विद्यार्थ्यांना घरपोच आहार देण्यात आला. अजूनही शाळांमध्ये मध्यान्ह भोजन सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना दरमहा पोषण आहार दिला जात आहे.
- सुभाष घुगे, पोषण आहार अधीक्षक.