शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत संततधार ; भात शेती पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 19:03 IST

घोटी : इगतपुरी तालुक्याच्या सर्व भागात शनिवारी दिवसभर पावसाची धो-धो सुरूच आहे. धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू ...

ठळक मुद्देधरणे ओव्हरफ्लो, पर्यटकांना धरण भागात जाण्यास मज्जाव

घोटी : इगतपुरी तालुक्याच्या सर्व भागात शनिवारी दिवसभर पावसाची धो-धो सुरूच आहे. धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाम, भावली, दारणा, वाकी खापरी धरण परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. धोकादायक पुलांवरून वाहतूक थांबविण्यात आली असून, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला सतर्कता राखण्यास सांगण्यात आले आहे.भाताच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने शेतांना नद्यांचे स्वरूप आले आहे. भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी गोंदे दुमालाचे सरपंच गणपत जाधव यांनी केली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि पोलिसांना सूक्ष्म लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तहसीलदार वंदना खरमाळे-मांडगे यांच्या देखरेखीखाली तालुक्यातील घटनांवर लक्ष ठेवले जात आहे.तालुक्यात १२ तासांत २२१ मिमी पाऊस पडला असून, संततधार सुरूच आहे. आतापर्यंत पडलेल्या ३०५२ मिमी पावसाने नद्या, नाले, धरणे भरली आहेत. शनिवार अखेर ९१.७९ टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. कोणत्याही क्षणी इगतपुरी तालुक्यात पाऊस शंभरी गाठण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्त्यांवरील पुलांवर पाणी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणाकडे जाणाºया मार्गावरील वाहतूक आणि पर्यटकांची वाहने पोलिसांकडून वळविण्यात आली आहे. पावसाने झोडपून काढल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. काही ठिकाणी झाडे पडल्याचे समजते आहे. अतिपावसामुळे रस्त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. शेतीची कामे थंडावलीसंपूर्ण इगतपुरी तालुक्यातील बहुतांशी भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून वाहत आहे. यामुळे भाताच्या लागवडीवर दुष्परिणाम झाला आहे. काही गावांमध्ये वाहत्या पाण्यामुळे भात पीक वाहून गेले आहे. त्यामुळे भाताची रोपे नव्याने मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आटापिटा करावा लागेल.अपर वैतरणा धरण ओव्हरफ्लोमुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्त्वाचे अपर वैतरणा धरण शनिवार अखेर ओव्हरफ्लो झाले. धरणाचे पाचही दरवाजे तीन फुटाने उघडण्यात आले असून, ९२०० क्युसेसने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुंबईकरांना अपर वैतरणा धरण भरल्यामुळे दिलासा मिळाला असून, मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटणार आहे.इतिहासामध्ये अपर वैतरणा धरण बांधल्यापासून प्रथमच धरणातील पाणीसाठा मृतसाठ्याजवळ गेला होता. दरम्यान, धरण गतवर्षी भरणार की नाही अशी चर्चा रंगू लागली होती; मात्र धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने शनिवार अखेर धरण भरल्याने मुंबईकरांसह धरण परिसरातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून संततधार सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत आहे. वैतरणा धरणाचे पाचही दरवाजे उघडून विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो, असे प्रशासनाने सांगितले.———————————————-गोंदे दुमाला आणि तालुक्याच्या अनेक भागातील शेतकरी अतिपावसामुळे नुकसानग्रस्त झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे.- गणपत जाधव, सरपंच गोंदे दुमाला——————————————पाणी वाहत असल्यास वाहने पाण्यात घालू नये. पर्यटकांना वाहत्या पाणी परिसरात बंदी करण्यात आली आहे. विजेच्या खांबांना आणि उपकरणांना स्पर्श करू नये. धुक्यात वाहनांचे लाइट आणि इंडिकेटर सुरू करावे. आपत्कालीन प्रसंगासाठी तालुका प्रशासन सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाची मदत घ्यावी.- वंदना खरमाळे-मांडगे, तहसीलदार इगतपुरी————————

टॅग्स :NashikनाशिकfloodपूरFarmerशेतकरीagricultureशेती