शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

वाळू चोरीचे कारनामे पाहून अधिकारी अवाक्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2016 23:07 IST

ट्रकचे बनावट क्रमांक : गोणपाटात भरली वाळू

नाशिक : पिंपळगाव बसवंत येथील देशमाने पेट्रोलपंपालगत महसूल विभागाने पकडलेल्या बेकायदेशीर वाळू साठ्यातून वाळू चोरीच्या अनेक नवनवीन कल्पना उघडकीस आल्या असून, वाळू तस्करांनी वाहतूक करण्यासाठी बनावट क्रमांकाची वाहने वापरण्याबरोबरच संशय येऊ नये म्हणून वाळू पोत्यात भरून त्याची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले आहे. वाळू तस्करांच्या या क्लृप्त्या पाहून अधिकाऱ्यांनीही तोंडात बोटे घातली आहेत. बुधवारी सायंकाळी अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, गौणखनिज अधिकारी गणेश राठोड, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी पिंपळगाव बसवंत येथील दीपक बनकर यांच्या शेतगटात छापा मारून सुमारे १२९ ब्रास वाळू, अकरा वाहने असा कोट्यवधी रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दिलीप अर्जुन गुंजाळ (रा. साकोरे) व त्याच्या सहकाऱ्यांविरोधात संगनमताने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, ज्यावेळी अधिकाऱ्यांनी वाळूचा साठा जप्त केला त्यावेळी अनेक नवनवीन गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या आहेत. यातील काही वाहनांवर वेगवेगळे क्रमांक टाकल्याचे आढळून आले, तर काही वाहनांचे क्रमांक संशयास्पद व खाडाखोड केलेले दिसून आले. त्याचबरोबर वाळू भरण्यासाठी खडी क्रशरसारखा प्लान्ट लावण्यात आल्याचेही आढळून आले. या ठिकाणी वाळू स्वयंचलित यंत्रातून चाळणी करून पाण्याने धुतली जात असल्याचे व तेथून थेट यंत्राद्वारे ती पोत्यांमध्ये भरली जात होती. अशा प्रकारे तीन मालट्रकमध्ये धान्याप्रमाणे गोणपाटात वाळू भरून ठेवण्यात आल्याचे पाहून अधिकारीही बुचकळ्यात पडले. या प्रकरणी जिल्हा गौणखनिज अधिकारी गणेश राठोड यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पत्र पाठवून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे क्रमांकाच्या आधारे त्यांचे मालक व खऱ्या क्रमांकाचा शोध घेण्याची विनंती केली आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या मते काही वाहनांना दुचाकीचे बनावट क्रमांक लावण्यात आलेले असावेत जेणे करून वाळूची चोरी करून पळून गेलेल्या वाहनाची नंबर प्लेट तत्काळ बदलणे शक्य होते. (प्रतिनिधी)