शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांची ‘झाडाझडती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:16 IST

पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेबाबत केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. ५) दुपारी अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मुख्यालय इमारतीतील काही विभागांना भेटी देऊन खातेप्रमुखांची ‘झाडाझडती’ घेतली. तसेच दिवाळीपूर्वीच सर्व विभागांची स्वच्छता झाली पाहिजे, असे आदेश दिले.

नाशिक : पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेबाबत केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. ५) दुपारी अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मुख्यालय इमारतीतील काही विभागांना भेटी देऊन खातेप्रमुखांची ‘झाडाझडती’ घेतली. तसेच दिवाळीपूर्वीच सर्व विभागांची स्वच्छता झाली पाहिजे, असे आदेश दिले.दीपककुमार मीणा यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांच्यासह मुख्यालयातील पदाधिकाºयांच्या कक्षांना भेटी देऊन पाहणी केली. बांधकाम विभाग दोन व तीन, आरोग्य आणि कृषी विभागात जाऊन पाहणी करीत खातेप्रमुखांना सूचना केल्या. कार्यकारी अभियंता एस. पी. राजगुरू, संजय नारखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा कृषी अधिकारी हेमंत काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी. जी. सोनकांबळे यांच्या विभागांना भेटी देऊन स्वच्छतेविषयक सूचना केल्या. आरोग्य विभागातील रिकामे लोखंडी कपाटे, तसेच फायलींचे गठ्ठे त्वरित दूर करण्याचे आदेश दिले. कृषी विभागाच्या तळमजल्यावरील गुदामातील अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या नस्त्यांचे गठ्ठे त्वरित साफ करून ते गुदाम मोकळे करण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले. स्वच्छतेचे काम करणाºया कर्मचाºयांना हातमोजे, तोंडाला लावण्याचे मास्क पुरविण्याच्या सूचना डॉ. सुशील वाकचौरे यांना दिल्या. कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना मुख्य इमारतीला जेथे गळतीमुळे भिंतींना तडे गेले आहेत, तेथे दुरुस्ती तसेच संपूर्ण इमारतीची स्वच्छता व रंगरंगोटी दिवाळीपूर्वी करण्याच्या सूचना केल्या. दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी तत्काळ सेसचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले. शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांच्या कक्षातजाऊन त्यांनी पगार यांच्याशी चर्चा करीत दुरुस्ती व रंगरंगोटीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. दोन ते तीन लाखांत हे सर्व होईल, असे सिद्धार्थ तांबे यांनी सांगितले.