पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक
By Admin | Updated: March 2, 2017 00:56 IST2017-03-02T00:55:49+5:302017-03-02T00:56:00+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील पंचायत समितीच्या सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी पूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर मावळत्या पदाधिकाऱ्यांची सर्वसाधारण सभा शुक्र वारी (दि. ३) बोलावण्यात आली आहे

पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक
त्र्यंबकेश्वर : येथील पंचायत समितीच्या सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १३ मार्च रोजी पूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर मावळत्या पदाधिकाऱ्यांची सर्वसाधारण सभा शुक्र वारी (दि. ३) बोलावण्यात आली आहे. सन २०१२ ला त्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर काँग्रेसने सहापैकी पाच सदस्य निवडून निर्विवाद बहुमत मिळविले होते, तर महिला राखीव जागेवर वाघेरा गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निवडून आला होत्या. जि.प. सदस्यांमध्ये अंजनेरी गटातून संपतराव सकाळे, ठाणापाडातून निर्मला गिते, तर हरसूल गटातून इंदुमती खोसकर यांची निवड करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर पंचायत समिती सदस्यांमध्ये ठाणापाडा गणातून मंगळू निंबारे, योगीता मौळे (मुळवड), सुनंदा भोये (हरसूल), लंकाबाई बदादे (वाघेरा), शांताराम मुळाणे (अंजनेरी) व देवगाव गणातून गणपत वाघ हे सभासद निवडून आले होते. वीस वर्षांत सन २०१२ची पंचवार्षिक काँग्रेससाठी सुवर्ण काळ होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. तसेच जि.प. सदस्य संपतराव सकाळे यांनी उपाध्यक्षपदापर्यंत धाव घेतली होती. जवळपास तीन वर्षे ते उपाध्यक्ष होते. काँग्रेसने तालुक्यावर एकहाती सत्ता मिळविली होती. दरम्यान, शुक्रवारी मावळत्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली असून, बैठकीत तालुक्यातील अपूर्ण कामे, टंचाई स्थितीचा आढावा, तालुक्यातील सध्या भासणारी पाणीटंचाई, स्थलांतर पाणीपुरवठ्याची कामे आदिंवर चर्चा होऊन नवनिर्वाचित पं.स. सभासदांना शुभेच्छा देऊन सभेची सांगता होईल. गत पाच वर्षांच्या कार्यकाळात पाचही वर्षे सभापतिपदाची संधी चारही सदस्य (अनु. जमाती) मिळाली, तर एक महिला सदस्य विरोधी पक्षा (राष्ट्रवादी)च्या असल्याने त्यांची वर्णी लागली होती. नशीबवान ठरलेल्या शांताराम मुळाणे यांना पाचही वर्षे उपसभापतिपदाची संधी मिळाली. एवढेच नव्हे तर सभापतींची टर्म संपल्यानंतर मधल्या काळात प्रभारी सभापती म्हणून कार्यभारदेखील त्यांनी स्वीकारलेले ते पहिले उपसभापती ठरले आहेत.