आखाडा महंतांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठकत्

By Admin | Updated: July 25, 2014 00:26 IST2014-07-24T23:00:47+5:302014-07-25T00:26:41+5:30

आखाडा महंतांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठकत्

Officials Friday's meeting in the presence of Akhada Mahants | आखाडा महंतांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठकत्

आखाडा महंतांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठकत्

र्यंबकेश्वर : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील दहा अखाड्यांच्या श्रेष्ठींसमवेत विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील तसेच मेळा अधिकारी महेश पाटील, उदय किरणे आदि प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक शुक्रवारी (दि.१) रोजी आयोजित केली आहे. या बैठकीत महंतांच्या समस्या,विविध मागण्या अदिंबाबत साधू-मंहतांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. त्र्यंबक पालिका सभागृहात ही बैठक होणार असल्याचे समजते.
नाशिक शहरातील एकूण तीन अखाड्यातील साधू-महंत आणि त्र्यंबकेश्वर येथील दहा अखाड्यांचे साधू व प्रशासकीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले होते. तथापि, त्र्यंबकच्या दहा अखाड्यांच्या प्रतिनिधींनी आमच्या दहा अखाड्यांची स्वतंत्र बैठक त्र्यंबकलाच घ्या, अशी आग्रहाची मागणी येथील अखाडा परिषदेच्या केली होती. आता त्र्यंबक पालिका सभागृहात बैठक बोलविली आहे. या बैठकीसाठी आनंदा अखाड्याचे स्वामी सागरानंद सरस्वती महंत शंकरानंद उर्फ भगवान बाबा, निरंजनी अखाड्याचे महंत रवींद्र पुरी, नरेंद्र पुरी, जुना अखाडा-महंत हरिगिरीजी, महंत प्रेमगिरीजी, अवाहन अखाडा-महंत मधुसुदनगिरी, अग्नि अखाडा-महंतगोविंदानंद ब्रह्मचारी, महानिर्वाणी-महंंत हरिनारायण पुरी-रमेशगिरीजी, अटल अखाडा-महंत उदयगिरी, उदासीन अखाडा-महंत रघुमुनीजी, महंत दुर्गादासजी, आगारदासजी, उदासीन नया महंत केवलदासी, विचारदासजी, निर्मल अखाडा- महंत बलवंतसिंग तसेच नगरपालिकेचे नगराध्यक्ष यशोदा अडसरे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे आदि उपस्थित राहणार असल्याचे समजते.(वार्ताहर)

Web Title: Officials Friday's meeting in the presence of Akhada Mahants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.