पदाधिकाऱ्यांची वाहने जमा

By Admin | Updated: January 7, 2017 01:28 IST2017-01-07T01:28:13+5:302017-01-07T01:28:26+5:30

पदवीधर निवडणूक : प्रशासनाचा दावा

Officers deposited in the office | पदाधिकाऱ्यांची वाहने जमा

पदाधिकाऱ्यांची वाहने जमा

 नाशिक : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाहने जमा केल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांना दिलेले शासकीय लालदिव्याचे वाहन (एम. एच. १५ ३३३) यासह कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांना दिलेले वाहन (एम.एच.१५ २५५) महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे व समाजकल्याण सभापती उषा बच्छाव यांना देण्यात आलेले दोनही वाहने अशी एकूण चार वाहने जिल्हा परिषद प्रशासनाने जमा झाल्याचा दावा केला आहे. नाशिक विभाग पदवीधर निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने गुरुवारी (दि.५) यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी एक पत्र काढून सामान्य प्रशासन विभागाला आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना केल्या होत्या. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना त्यांची सरकारी वाहने जमा करण्याचे आदेश दिले होेते. त्यात जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली सरकारी वाहने तत्काळ जमा करून त्यांना पुरविण्यात आलेली दूरध्वनी सेवाही खंडित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सद्यस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे, समाजकल्याण सभापती उषा बच्छाव, महिला व बालकल्याण सभापती शोभा डोखळे, कृषी व पशुसंवर्धन केदा अहेर यांच्याकडे सरकारी वाहने होती. त्यांना सर्वांना वाहने जमा करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने सर्व पदाधिकाऱ्यांना पत्र काढून दिल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Officers deposited in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.