शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

बागलाण पंचायत समितीतील अधिकारी दौर्‍याच्या नावे बाहेरगावी

By admin | Updated: May 24, 2014 00:20 IST

निकवेल : बागलाण पंचायत समिती सदस्य पंचायत समितीमध्ये, मात्र अधिकारी बाहेर अशी परिस्थिती पहावयास मिळाली.

निकवेल : बागलाण पंचायत समिती सदस्य पंचायत समितीमध्ये, मात्र अधिकारी बाहेर अशी परिस्थिती पहावयास मिळाली.काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बागलाण पंचायत समिती सभापती गीता सोनवणे सह सदस्य भास्कर बच्छाव, सोमनाथ सूर्यवंशी आदि सदस्य पंचायत समितीमध्ये दाखल झाले. मात्र संबंधित विभागामध्ये फेरफटका मारला असता प्रत्येक कार्यालयामध्ये अधिकारी गायब होते.कार्यालयामध्ये फक्त टेबल खुच्या व्यतिरिक्त सर्व मोकळे कार्यालय दिसत होते. सदर बागलाण पंचायत समितीचे बहुतांश अधिकारी हे कार्यालयामध्ये थांबत नाहीत कायम दौर्‍यावर असतात. अनेक वेळा तक्रारी करूनही या संदर्भात प्रशासन कुठलीही कार्यवाही करत नाही. तसेच अधिकारी हे मनमानी करून सदस्यांना कुठल्याच प्रकारे माहिती देत नाही. सभापती सह सदस्य हे सभापती हॉलमध्ये उपस्थित असताना गटविकास अधिकारी सुरेखा कोदे यांना भेटण्यासाठी सदस्यांना अक्षरश: त्यांच्या वाहनापर्यंत जावे लागले. आणि विचारणा करताच दौरा असल्याचे सांगितले व त्या निघून गेल्या.त्यानंतर सभापतींसह सदस्यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली असता सर्व कार्यालयांमध्ये फक्त टेबल खुर्ची व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. संतप्त सदस्यांनी सहायक प्रशासक अधिकारी पी. बी. जगताप यांची भेट घेतली. तेव्हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला गेला.याचवेळी सकाळी गाजावाजा करत जिल्हा परिषदच्या सेसमधून प्लास्टीक कॅरेट, समाज कल्याणतर्फे पाईप आदि औजाराचे वाटपाचा कार्यक्रम सकाळी झाला. त्यानंतर दुपारी आलेल्या औजारे घेणार्‍या लाभार्थीना अक्षरश: अधिकारी नसल्याने अधिकार्‍याची वाट बघावी लागली. मात्र अधिकारी शेवटपर्यंत आले नाही. औजारे घेणारे लाभार्थी आपल्या पावली वाट पाहून त्यांच्या गावी गेले.सदर पंचायत समितीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. अधिकारी हे बाहेरगावी दौर्‍याच्या नावाने पंचायत समितीत दांडी मारतात. अशा दांडी मारणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सभापती गिता सोनवणे, भास्कर बच्छाव, सोमनाथ सूर्यवंशी, परशुराम अहिरे, लक्ष्मण सोनवणे, सतीश विसपुते यांनी सांगितले.कोटबागलाण पंचायत समितीतील बरेच अधिकारी दौरानिमित्त दांड्या मारतात. पंचायत समिती कार्यालयामध्ये कायम टेबल खुर्ची व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. त्यामुळे यापुढे दांडी मारण्यार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.भास्कर बच्छावपं. स. सदस्य, बागलाण