बागलाण पंचायत समितीतील अधिकारी दौर्‍याच्या नावे बाहेरगावी

By Admin | Updated: May 24, 2014 00:20 IST2014-05-22T23:42:16+5:302014-05-24T00:20:09+5:30

निकवेल : बागलाण पंचायत समिती सदस्य पंचायत समितीमध्ये, मात्र अधिकारी बाहेर अशी परिस्थिती पहावयास मिळाली.

Officers of Baglan Panchayat Samiti | बागलाण पंचायत समितीतील अधिकारी दौर्‍याच्या नावे बाहेरगावी

बागलाण पंचायत समितीतील अधिकारी दौर्‍याच्या नावे बाहेरगावी

निकवेल : बागलाण पंचायत समिती सदस्य पंचायत समितीमध्ये, मात्र अधिकारी बाहेर अशी परिस्थिती पहावयास मिळाली.
काल दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बागलाण पंचायत समिती सभापती गीता सोनवणे सह सदस्य भास्कर बच्छाव, सोमनाथ सूर्यवंशी आदि सदस्य पंचायत समितीमध्ये दाखल झाले. मात्र संबंधित विभागामध्ये फेरफटका मारला असता प्रत्येक कार्यालयामध्ये अधिकारी गायब होते.
कार्यालयामध्ये फक्त टेबल खुच्या व्यतिरिक्त सर्व मोकळे कार्यालय दिसत होते. सदर बागलाण पंचायत समितीचे बहुतांश अधिकारी हे कार्यालयामध्ये थांबत नाहीत कायम दौर्‍यावर असतात. अनेक वेळा तक्रारी करूनही या संदर्भात प्रशासन कुठलीही कार्यवाही करत नाही. तसेच अधिकारी हे मनमानी करून सदस्यांना कुठल्याच प्रकारे माहिती देत नाही. सभापती सह सदस्य हे सभापती हॉलमध्ये उपस्थित असताना गटविकास अधिकारी सुरेखा कोदे यांना भेटण्यासाठी सदस्यांना अक्षरश: त्यांच्या वाहनापर्यंत जावे लागले. आणि विचारणा करताच दौरा असल्याचे सांगितले व त्या निघून गेल्या.
त्यानंतर सभापतींसह सदस्यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली असता सर्व कार्यालयांमध्ये फक्त टेबल खुर्ची व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. संतप्त सदस्यांनी सहायक प्रशासक अधिकारी पी. बी. जगताप यांची भेट घेतली. तेव्हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला गेला.
याचवेळी सकाळी गाजावाजा करत जिल्हा परिषदच्या सेसमधून प्लास्टीक कॅरेट, समाज कल्याणतर्फे पाईप आदि औजाराचे वाटपाचा कार्यक्रम सकाळी झाला. त्यानंतर दुपारी आलेल्या औजारे घेणार्‍या लाभार्थीना अक्षरश: अधिकारी नसल्याने अधिकार्‍याची वाट बघावी लागली. मात्र अधिकारी शेवटपर्यंत आले नाही. औजारे घेणारे लाभार्थी आपल्या पावली वाट पाहून त्यांच्या गावी गेले.
सदर पंचायत समितीमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. अधिकारी हे बाहेरगावी दौर्‍याच्या नावाने पंचायत समितीत दांडी मारतात. अशा दांडी मारणार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे सभापती गिता सोनवणे, भास्कर बच्छाव, सोमनाथ सूर्यवंशी, परशुराम अहिरे, लक्ष्मण सोनवणे, सतीश विसपुते यांनी सांगितले.
कोट
बागलाण पंचायत समितीतील बरेच अधिकारी दौरानिमित्त दांड्या मारतात. पंचायत समिती कार्यालयामध्ये कायम टेबल खुर्ची व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. त्यामुळे यापुढे दांडी मारण्यार्‍या अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
भास्कर बच्छाव
पं. स. सदस्य, बागलाण

Web Title: Officers of Baglan Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.