शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 00:18 IST

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.

ठळक मुद्देगुलाबाचे फुलऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता

चांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालाऐवजी शेतीतच विवाह सोहळा करण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.राज्यात लॉकडाऊन लागल्यानंतर विवाह सोहळ्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतात छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे.यामुळे खर्चाला मोठा आळा, तसेच मोजक्याच मंडळींच्या उपस्थित, कमी गर्दी असल्याने यासाठी वेगळी उपाय योजना करण्याची गरज भासत नाही. विवाह समारंभ निश्चितच करूनदिलेली संख्या थोडी वाढली तरी चालते असेही बोलले जात आहे.त्यामुळे हा शेतातील सोहळ्याचा पर्याय वर-वधूकडील मंडळी निवडत असल्याचे पाहावयास मिळत आहे. विवाह समारंभाबाबत अनेकांच्या इच्छा अपेक्षा असतात. सोहळा थाटामाटात संपन्न व्हावा, जेवढी वऱ्हाडी मंडळींची उपस्थिती तेवढे मोठे लग्न म्हणून पत्रिका, मूळ पत्रिका हजारोंनी दिल्या जायच्या. जेवणावळी उठायच्या. त्यासाठी वेगवेगळे मेनू तयार करायचे. परंतु आताच्या काळात हे सगळं स्वप्नवत झाले आहे.अत्तराऐवजी सॅनिटायझर तर फुलांऐवजी मास्कअगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते.मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.शेतातील आखाड्यावर स्वयंपाकशेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपमोगतआहेत.

कार्यालयातील लग्न सोहळे आता शेतातचांदोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी बंधने आहेत. यामुळे ग्रामीण भागात लग्नासाठी मंगल कार्यालयाऐवजी शेतातच विवाह सोहळा उरकण्यास पसंती दिली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक विवाह सोहळे शासनाचे नियम पाळत शेतीमध्ये होताना दिसत आहेत.शासनाने कडक निर्बंध घालून दिल्याने विवाह सोहळे कमीत कमी लोकांमध्ये व कमी वेळात साजरे करावे लागत आहेत. जिल्ह्यात ग्रामीण भागात मात्र विवाहाचे मुहूर्त साधत साध्या पद्धतीने आपल्या शेतातच छोटासा मंडप टाकून विवाह सोहळे होताना दिसत आहे. अगोदर विवाह सोहळ्याप्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे अत्तर वा सुगंधी पाणी मारून स्वागत करायचे. आता मात्र त्याची जागा सॅनिटायझरने घेतली असून पाहुण्यांना हातावर सॅनिटायझर दिले जाते. मंडपात प्रवेश करताना गुलाबाचे फुल आणि अक्षता दिल्या जायच्या. आता त्याऐवजी आलेल्यांना मास्क व अक्षता दिल्या जात असल्याचे विवाह सोहळ्याचे हे नवे रूप पाहावयास मिळत आहे.शेतातील आखाड्यावर स्वयंपाकशेतात एक छोटासा मंडप, आजूबाजूला असलेली झाडांची सावली. तिथेच पत्र्याच्या शेडमध्ये अथवा शेतातील आखाड्यावर स्वयंपाक होत आहे. आलेली पाहुणे मंडळी शेतात सावलीसाठी झाडांचा आसरा घेत त्याचा वेगळा आनंद उपभोगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :marriageलग्नagricultureशेती