निमाच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:44 IST2018-08-01T00:44:37+5:302018-08-01T00:44:52+5:30
निमाच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी मावळते अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्याकडून मंगळवारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

निमाच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण
सातपूर : निमाच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी मावळते अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्याकडून मंगळवारी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. निमाची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. खजिनदार हर्षद ब्राह्मणकर यांनी अहवाल सादर करून सभासदांकडून मंजुरी घेण्यात आली. पाटणकर यांनी आपल्या कारकिर्दीतील वर्षभराचा आढावा घेतला. त्यात निमाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मावळते उपाध्यक्ष डॉ. उदय खरोटे यांनी नवनिर्वाचित उपाध्यक्ष शशिकांत जाधव यांच्याकडे उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविला. तर मावळते सरचिटणीस यांनी तुषार चव्हाण यांचेकडे पदभार दिला. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांची आणि पदाधिकाºयांची अधिकृत निवड जाहीर केली. यावेळी व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. भुतानी, विवेक गोगटे, एन. टी. अहिरे, श्रीकांत बच्छाव आदी उपस्थित होते. चर्चेत जयप्रकाश जोशी, संजय महाजन, संजय देशमुख, जे. आर. वाघ आदींनी भाग घेतला. यावेळी नितीन वागस्कर, कैलास आहेर, संजीव नारंग, प्रदीप पेशकार, निखिल पांचाळ, भरत येवला, संदीप भदाणे, संदीप सोनार, उदय रकिबे, सुधाकर देशमुख, आर. वेंकटाचलम, रमेश वैश्य, राजेंद्र छाजेड आदी सभासद उपस्थित होते. उद्योजकांचे लक्ष लागून असलेल्या निमा या संस्थेच्या निवडणुकीत तब्बल बारा वर्षानंतर सत्तांतर झाले असून त्यामुळे नव्याने निर्वाचित झालेल्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.