शिंगवे येथील महावितरणचे कार्यालय गैरसोयी

By Admin | Updated: June 27, 2014 00:15 IST2014-06-26T21:44:49+5:302014-06-27T00:15:34+5:30

शिंगवे येथील महावितरणचे कार्यालय गैरसोयी

Office of the MahaVitran at Shingway is inconvenient | शिंगवे येथील महावितरणचे कार्यालय गैरसोयी

शिंगवे येथील महावितरणचे कार्यालय गैरसोयी

 

  दरेगाव : चांदवड तालुक्यातील पूर्वभागातील वीज वितरण कंपनीच्या शिंगवे कक्षाचे कार्यालय सध्या वितरणच्या वडगावपंगू येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रात आहे. या कक्षात नऊ गावे समाविष्ट असून, नागरिकांच्या सोयीसाठी ते पूर्वीप्रमाणेच सर्व गावांना सोयीस्कर असलेल्या मनमाड येथे मध्यवर्ती ठिकाणी ठेवावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
शिंगवे कक्षाअंतर्गत दरेगाव, निमोण, शिंगवे, मेसनखेडे खुर्द, मेसनखेडे बु।।, रापली वडगाव, कातरवाडी व तळेगाव रोही ही गावे येतात. सध्या महावितरणाचे शिंगवे कक्षाचे कामकाज वडगावपंगू उपकेंद्रातील कार्यालयातून चालते. वीजग्राहकांना नवीन कनेक्शन, वीज खंडित होणे, वीजबिल दुरुस्ती व विजेसंबंधीच्या अन्य समस्यांच्या निवारणाकरता वडगाव पंगू येथे जावे लागते. शिंगवे कक्ष असतानाही शिंगवेसह निमोण, दरेगाव, मेसनखेडे या गावांना अतिशय गैरसोयीचे सदर कार्यालय आहे. भौगोलिकदृष्ट्या येवला तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या या कार्यालयास एक, दोन गावांव्यतिरिक्त सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो.
वीज वितरणाचे वरिष्ठ कार्यालय चांदवडला आहे. त्यामुळे कक्ष उपविभाग या दोन्ही ठिकाणी एका वेळी जाणे मोठे जिकिरीचे ठरते. त्यामुळे शिंगवे कक्ष कार्यालय यापूर्वी
वीज कंपनीच्या मनमाड येथील
अन्न महामंडळाच्या रस्त्यालगत असणाऱ्या कार्यालयात होते. सदर कार्यालय हे सर्व दृष्टीने सोयीचे असल्याने मनमाडला सुरू करावे, अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Office of the MahaVitran at Shingway is inconvenient