ऑफिस फोडून पावणेदोन लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST2021-07-05T04:10:10+5:302021-07-05T04:10:10+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप आव्हाड (३६, दत्त चौक, गंगापूर रोड) यांचे डेअरी पाॅवर लिमिटेड नाशिक जिल्ह्यात २५ डिस्ट्रिब्युटर ...

Office burglary and robbery of Rs | ऑफिस फोडून पावणेदोन लाखांची लूट

ऑफिस फोडून पावणेदोन लाखांची लूट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप आव्हाड (३६, दत्त चौक, गंगापूर रोड) यांचे डेअरी पाॅवर लिमिटेड नाशिक जिल्ह्यात २५ डिस्ट्रिब्युटर हब असून त्याचे गोडाऊन आणि ऑफिस राजीवनगर येथे आहे. जिल्ह्यातील सर्व दुकानांची रक्कम गोळा करून गोडाऊनलगत असलेल्या ऑफिसमध्ये व्यवस्थापक अनिल जाधव यांच्याकडे जमा केली जाते. शनिवारी (दि. ३) रोजी रात्री बारा वाजेपर्यंत व्यवस्थापक अनिल जाधव गोडाऊनच्या आवारात होते. गोडाऊनच्या बाजूला असलेल्या ऑफिसचा पाठीमागील पत्रा कापून आत मधील शीट कापलेले आहे, असे कळवल्यावर आव्हाड तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, चोरट्यांनी प्रवेश करून तीन वेगळ्या ड्राॅव्हरपैकी एक ड्राॅव्हर तोडून त्यातील १ लाख ७५ हजार २४४ रुपये रोख आणि ५०० ग्रॅम वजनाचे ३६ तुपाचे डबे सुमारे दहा हजार ६२० रुपये किमतीचे असा एक लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे

Web Title: Office burglary and robbery of Rs