महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण
By Admin | Updated: November 28, 2014 22:55 IST2014-11-28T22:55:03+5:302014-11-28T22:55:18+5:30
पुण्यतिथी : शाळा-शाळांमध्ये महात्मा जोतिबा फुले यांचे स्मरण

महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण
नाशिक : महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात विविध ठिकाणी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. शाळांमध्ये आदरांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अभिनव बालविकास मंदिर
मराठा विद्या प्रसारक समाजाचे अभिनव बालविकास मंदिर या शाळेत महात्मा जोतिराव फुले यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी व वैशाली देवरे तसेच ज्येष्ठ शिक्षक शोभा गायकवाड, कारभारी तांदळे, ज्योती पवार यांच्या हस्ते महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी सर्व शिक्षक उपस्थित होते. रूपाली जाधव यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन पौर्णिमा पगार यांनी केले.
सागरमल मोदी विद्यालय
ना. ए. सोसायटी संचलित सागरमल मोदी विद्यालयात महात्मा जोतिराव फुले यांची स्मरण करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्र निकम यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी जयश्री दोंदे, सौ. उज्ज्वला कासार उपस्थित होते. शाळेतील कल्पेश मासरे हा विद्यार्थी जोतिरावांच्या पोषाखात कार्यक्रमात सहभागी झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोतिरावांच्या जीवनावरील अनेक प्रसंग विशद केले. सूत्रसंचालन नेत्रा साने या विद्यार्थिनीने केले. प्रीती पालवे या विद्यार्थिनीने आभार मानले. कार्यक्रमास अशोक शिरुडे, श्रीराम ठाकरे, श्रीमती शोभा ठाकूर, सौ. कल्पना उदावंत, सौ. उषा जोपळे उपस्थित होते.
श्री श्यामलाल गुप्ता हिंदी प्राथमिक विद्यालय
श्री श्यामलाल गुप्ता हिंदी प्राथमिक विद्यालय, श्रमिकनगर विद्यालयात शिक्षणमहर्षी महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक एस. एस. बिरारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वसुधा पोफळे, गीतांजली सोनवणे यांची भाषणे झाली.
इंदिरा गांधी विद्यालय
सातपूर-शिवाजीनगर येथील इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १२४ वी पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरुण नवले होते. नवले यांनी फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक अरुण नवले यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या समाजासाठी असलेल्या योगदानाबद्दल आणि शैक्षणिक क्रांतीबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता देवरे यांनी केले. यावेळी उज्ज्वला पवार, उषा गाडे, सविता सातभाई, ज्योती कापडे, रूपाली अहेर, वैशाली बिडगर, वृषाली पाटोळे, सोनाली पोरजे, कैलास जाधव, सीताराम धुर्जड आदि शिक्षक उपस्थित होते.
सरस्वती विद्यालय
दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित सरस्वती विद्यालय मराठी माध्यम कामटवाडे येथे महात्मा फुले पुण्यतिथीदिनी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक सुगंधा सोनवणे, शिल्पा भामरे, कांचन अलाणे यांनी जोतिबांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल चोथे यांनी केले.
न्यू मराठा हायस्कूल
मविप्र समाजाचे न्यू मराठा हायस्कूलमध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक सी. टी. साळवे, केटीएचएम कॉलेजचे प्राध्यापक ए. बी. सोनवणे, पी. टी. भागवत, एम. एन. सोमवंशी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. संगमनेरे यांनी आभार मानले.
वाघ गुरुजी शाळा
वाघ गुरुजी बालशिक्षण मंदिर शाळेत महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक मंदाकिनी सोनवणे यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजोळे यांनी फुले यांची जीवनचरित्रपर माहिती सांगितली. काही विद्यार्थी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. सूत्रसंचालन शीला थेटे यांनी केले. कार्यक्रमास रंजना घुले, कल्पना पाटील, मनीषा जाधव, मंगला गुळे, वैशाली मोरे, माई खैरनार, मीनाक्षी ठाकरे, सीमा भामरे, कविता आगळे, मोहिनी निंबाळकर, रंजना बर्वे, पूनम कदम, दिलीप पाटील, नानासाहेब पाटील, बाळासाहेब पवार आदि शिक्षक उपस्थित होते.