बुद्धिदात्याला वही, पेन करा अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:04 IST2017-08-26T00:03:59+5:302017-08-26T00:04:03+5:30
चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होऊ शकेल! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे आवाहन केले असून, या नव्या चळवळीचा प्रारंभच नाशकातून करण्यात आला आहे.

बुद्धिदात्याला वही, पेन करा अर्पण
नाशिक : चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होऊ शकेल! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे आवाहन केले असून, या नव्या चळवळीचा प्रारंभच नाशकातून करण्यात आला आहे. गणराय हा श्रद्धेचा भाग असल्याने त्याला महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधीही विरोध केला नाही. मात्र तो परिवर्तनवादी व्हावा आणि लोकमान्य टिळकांनी ज्या वैचारिक प्रबोधनासाठी हा उत्सव सुरू केला, त्याचे खºया अर्थाने स्मरण व्हावे, अशी समितीची अपेक्षा आहे. बदलत्या काळात उत्सव बदलले पाहिजेत, या उद्देशाने १९९७ मध्ये चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी परिसरातील नदीपात्रात जाणारे निर्माल्य बाजूला काढतानाच विसर्जित गणेशमूर्ती दान करण्याची चळवळ सुरू केली. आता ही लोकचळवळ झाली असून, त्यामुळेच आता पुढील टप्पा म्हणून बुद्धिदाता गणरायाला वही आणि पेन अर्पण करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शाखेचे कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी दिली. गणपतीला अर्पण करण्यासाठी नागरिक हार, फुले आणि पेढे किंवा अन्य नैवेद्य देतात. बºयाचदा खूप हार-फुले आल्याने ते वापरले जात नाहीत तसेच नैवेद्यही पडून राहतो. त्यामुळे हार-फुले किंवा नैवेद्य सर्वांनीच देण्याऐवजी जर भाविकांनी बुद्धिदात्याला वही आणि पेन अर्पण केले, तर ते आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना देता येऊ शकेल. गणराय बुद्धी देवता असल्याने बुद्धिवर्धनासाठी अशा-प्रकारचा उपक्रम आधिक संयुक्तिक ठरेल, असे दातरंगे यांनी सांगितले.
उत्सव परिवर्तनशील हवेत आणि ते लोकोपयोगी ठरावेत यासाठी महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पूर्वीपासूनच प्रयत्न केले आहेत. समितीने श्रद्धेला कधीही हात घातला नाही. केवळ अशाप्रकारे कृतिशील उत्सव झाला तर ते पुरोगामित्वाच्या दिशेने एक पाऊल ठरेल, तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना ही श्रद्धांजली ठरेल.
- महेंद्र दातरंगे, जिल्हा कार्यवाह,
महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समिती