मोफत औषधे देतात विकत

By Admin | Updated: December 25, 2014 01:43 IST2014-12-25T01:43:06+5:302014-12-25T01:43:41+5:30

मोफत औषधे देतात विकत

Offer to buy free medicines | मोफत औषधे देतात विकत

मोफत औषधे देतात विकत

सातपूर : सातपूर कॉलनी येथील महापालिकेच्या रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांशी अरेरावीची भाषा करीत मोफत देण्यात येणाऱ्या औषधांचे पैसे घेत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन प्रभागाचे नगरसेवक सलीम शेख यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांना पाचारण केले.
यावेळी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड आणि डॉ. जयश्री नामपूरकर तेथे आल्यानंतर लता बाळासाहेब काळे, धर्मराज कदम, धर्मराज भदाणे, सविता नितीन काळे, शारदा रामचंद्र डोंगरे, जनार्दन जाधव आदि रुग्णांनी रुग्णालयातील तक्रारींचा पाढा वैद्यकीय अधीक्षक डॉ. गायकवाड यांच्यासमोर वाचला. तसेच मोफत औषधे रुग्णांना विकत दिली जात असल्याची तक्रार केली. यापुढे अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी येणार नाहीत. चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. गायकवाड यांनी रुग्णांना दिले. (वार्ताहर)

Web Title: Offer to buy free medicines