पदाचा गैरवापर केल्याची तक्र ार
By Admin | Updated: October 10, 2015 22:13 IST2015-10-10T22:11:12+5:302015-10-10T22:13:33+5:30
वेळापूर : माजी सरपंचाविरुद्ध बनावट खरेदीखत बनविल्याचा आरोप

पदाचा गैरवापर केल्याची तक्र ार
लासलगाव : वेळापूरच्या माजी सरपंच पार्वताबाई बाळू पवार यांनी पदाचा गैरवापर करून घरकुलाचा बखळ जागेचा बनावट उतारा तयार करून त्याआधारे खरेदीखत नोंदविल्याचा आरोप होत असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वेळापूरचे प्रभारी सरपंच नारायण पालवे यांनी केली आहे.
या प्रकरणात वेळापूरचे प्रभारी सरपंच नारायण पालवे यांनी निफाडच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांच्या कार्यालयात लेखी तक्र ार दाखल केली आहे. या अर्जात वेळापूरच्या माजी सरपंच पार्वताबाई पवार यांनी सरपंचपदी असताना पदाचा गैरवापर करून घरकुल क्र मांक १४९ व अनुक्रम नंबर १२५ यावर गणपत पवार यांना ३० मि. २० फूट व शौचालय अशी बखळ मोकळी जागा असा बनावट उतारा तयार करून त्याआधारे खरेदीखत क्र. ४६६/२०१५ स्वत:च्या फायद्याकरिता नोंंदविल्याचे व फसवणूक केल्याचे प्रभारी सरपंच नारायण पालवे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तहसीलदारांनी वितरित केलेल्या घरकुलाचे हस्तांतरण करू नये, असा नियम असतानाही पदाचा दुरुपयोग करून व असा उतारा तयार करून परस्पर खरेदीखत करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही पालवे यांनी केली आहे. (वार्ताहर)
''खरेदीखत क्र मांक ४६६/२०१५ चा दस्तावेज नोंदविण्याकरिता आला असता ग्रामपंचायतीच्या दप्तरी घरकुल क्र मांक घर नंबर १४९ व अ.नं. १२५ यावर गणपत दगडू पवार यांचे ३० मिटर २० फूट व शौचालय असा उतारा आहे. त्यामुळे या खरेदीखताची नोंद केली नाही. तसेच दस्तावेजातील उतारा कार्यालयाने दिलेला नाही''. - प्रकाश सूर्यवंशी,ग्रामविकास अधिकारी