उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 9, 2017 00:20 IST2017-07-09T00:20:30+5:302017-07-09T00:20:47+5:30
ंमालेगाव : शहरातील उघड्यावर शौचास बसणाऱ्या बारा जणांविरुद्ध छावणी, कॅम्प व शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : शहरातील उघड्यावर शौचास बसणाऱ्या बारा जणांविरुद्ध छावणी, कॅम्प व शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. उघड्यावर शौचास बसणाऱ्या विजय दिनकर भानगे, रा. सराव पाठशाळा मैदान, सुरेश यादव अहिरे रा. साने गुरुजीनगर, दीपक बाबूराव वाकोर्डे, रा.गणेशवाडी, राजेंद्र वाल्मीक धनाळकर रा.गणेशवाडी, पिनू बाबूराव कांबळे, रा.गणेशवाडी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांनी दिली. यांच्याविरुद्ध कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर शौचास बसणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मोसमपुलाखाली मोसम नदीकिनारी आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघड्यावर शौचास बसलेल्या राजाराम पांडुरंग खैरनार (६४) रा. वडगाव, आकाश सुभाष शेलार (२०) रा. अयोध्यानगर, भारत साहेबराव चव्हाण (२२) रा. नवीन वस्ती, मोतीबाग नाका यांच्याविरुद्ध छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. स्वच्छता निरीक्षक ए.आर. सौदे यांनी फिर्याद दिली.शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्यावर शौचास बसणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील आंबेडकर पुलाजवळील मोसम नदीपात्रात शौचास बसलेल्यांना पकडण्यात आले.