उपमहापौरांसह माजी महापौरांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: September 11, 2016 02:25 IST2016-09-11T02:25:17+5:302016-09-11T02:25:34+5:30
उपमहापौरांसह माजी महापौरांविरुद्ध गुन्हा

उपमहापौरांसह माजी महापौरांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : महानगरपालिकेत महासभेदरम्यान झालेल्या वादानंतर किल्ला पोलीस ठाण्यात विद्यमान उपमहापौर युनुस इसा यांच्यासह त्यांचे पुत्र माजी महापौर तथा एमआयएमचे शहराध्यक्ष नगरसेवक अब्दुल मलिक शेख व अब्दुल माजीद शेख यांच्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी माजीद शेख याला अटक केली आहे. याप्रकरणी महापौर हाजी मो. इब्राहीम हाजी मो. यासीन यांनी फिर्याद दिली आहे. अब्दुल माजीद शेख याने मनपा सभागृहात अनधिकृतपणे प्रवेश करून स्थायी समिती सभापती एजाज बेग अजीज बेग हे सूचना मांडत असताना त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांची पत्नी नगरसेविका यास्मिन एजाज बेग या भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगावकर हे करीत आहेत. तर स्थायी समिती सभापती यांच्या पत्नी नगरसेविका यास्मीन बेग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपमहापौर युनूस इसा, माजी महापौर व नगरसेवक अब्दूल मलिक यांचा भाऊ अब्दूल माजीद यांनी महासभा चालू असताना त्यांचे पती एजाज बेग महापौरांशी बोलत असताना युनुस इसा यांनी शिवीगाळ केली. तसेच अब्दूल मलिक व अब्दूल माजीद यांनी बेग यांना मारहाण केली. भांडण सोडविण्यास यास्मीन बेग गेल्या असता युनुस इसा यांनी शिवीगाळ केली तर अब्दूल मलिक व अब्दूल माजीद यांनी त्यांचा बुरखा फाडून सभागृहाबाहेर ओढून नेत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)